विद्युत ठेकेदार अनुज्ञाप्ती(लायसन्स) मिळण्याच्या दृष्टीने पात्र अभियंत्यांचा मेळावा

मेळाव्यास इच्छुक अभियंत्यांनी पूर्व नोंदणी करणे आवश्यक

भांडूप – विद्युत विभागाशी संबंधित कामाचे ठेके पात्र अभियंत्यांना उपलब्ध होऊन त्यांना रोजगार उपलब्ध व्हावे याकरता आवश्यक अनुज्ञाप्ती (लायसन्स) व इतर प्रक्रिया समजून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या अखत्यारीतील विद्युत निरीक्षण विभाग व महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या म्हणजेच अभियांत्रिकी पदवी/पदविका व त्यानंतर किमान एक वर्ष अनुभव असणाऱ्या अभियंत्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित अभियंत्यांना विद्युत निरीक्षक नंदकिशोर बेहरम हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी महावितरणच्या भांडूप नागरी परिमंडळाच्या मुख्य अभियंता श्रीमती पुष्पा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत.महावितरणच्या ठाणे येथील वागळे इस्टेट विभागाअंतर्गत असलेल्या विद्युत कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथे (जुने पासपोर्ट कार्यालय समोर) दि. १७मे २०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याकरता इच्छुक पात्र अभियंत्यांनी पूर्व नोंदणी करणे आवश्यक असून त्यांनी नोंदणी करता १६ मे अखेर कार्यालयीन वेळेत ०२२-२५८२६६६, ८८७९६२२५७६ व ८८७९६२५००५ या क्रमांकावर संपर्क साधावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त अभियंत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वाहाने यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email