विद्या मंदिर टिटवाळा शाळेतील विद्यार्थी पडून जिभेला 90% तुटली,उपचारासाठी कल्याण येथील रूग्णालयात दाखल
( म विजय )
टिटवाळा:- येथील विद्या मंदिर शाळेत इयत्ता तिसरीत (अ) तुकडीत शिकणारा जित गजानन महाडीक (10) शाळेतील वर्गात तोडांवर जोरात पडला आणि त्याची अपघातात 90% जीभ तुटली आहे. त्याला उपचारासाठी तातडीने कल्याण येथील एएमपीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे बाराच्या सुमारास शाळेत गेला होता. दुपारी एक ते दोनच्या सुमारास वर्गात बसला खाली बसला होता. जागेवरून उठायला गेला असता बॅगेच्या बेल्टला पाय आडकून तोंडादिशी जमिनीवर पडला. यात त्याची तोंडतील जीभ दांताच्या मध्ये आली असल्यामुळेच ती तुटली असल्याचा दावा डाॅक्टरांनी केला आहे. या अपघातात जीभ 90% तुटली असल्याचे डाॅक्टरांनी सागितले. मुलाला काल शिक्षकांनी बेंच वरून खाली बसविले नसते तर हा अपघात घडला नसता असे जीतच्या पालकांचे म्हणणे आहे. सदर उपचारासाठी एक लाखांच्या आसपास खर्च येणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या उपचारासाठी जीत च्या घरची परिस्थिती प्रतिकूल नसल्याने महाडीक कुटूंब मानसिक दबावाखाली असल्याचे दिसून येते. सदर मुलाच्या उपचारासाठी मदतीचा हात देणार्या दात्यांनी मो.न. 09769927131 वर संपर्क साधावा.