विद्यार्थी प्राण्यांच्या वेशभूषेत कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात दाखल

महापालिका क्षेत्रात प्राणी संग्रहालय बनवा

(श्रीराम कांदु)

कल्याण डोंबिवली मध्ये लहान मुलांसाठी प्राणी संग्रहालय उभारण्यात यावे अशी मागणी करत डोंबिवली मधील जय भारत इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी थेट पालिका मुख्यालय गाठत पालिका आयुक्तांची भेट घेत निवेदन सादर केले. विशेष म्हणजे या चीमुकल्याणी प्राण्यांची वेशभूषा करत पालिका मुख्यालयात प्रवेश केल्याने सर्वंचे लक्ष वेधून घेतले .यावेळी या विद्यार्थ्यांसह शाळेच्या शिक्षकांनी पालिका उपायुक्तांची भेट घेत चर्चा केली असता प्रशासनाकडून त्यांना याबाबत विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले

         कल्याण – डोंबिवली मध्ये लहान मुलांच्या मनोरंजणासाठी नेचर पार्क ,बॉटनिकल गार्डन ,प्राणी संग्रहालय नसल्याने या शहरासह आस्पसच्या परिसरात राहणाऱ्या मुलांणा याचा आनंद घ्यायचा असेल तर थेट मुंबई गाठावी लागते .मुंबईला येण्या जाण्यचा खर्च परवडत नसल्याने गरीब मुले या मनोरंजनापासून वंचित राहतात.कल्याण डोंबिवलीची निवड स्मार्ट सिटी मध्ये झाली असून कोट्यावधी चा निधी खर्ची घालत शहरे स्मार्ट होणार आहेत मात्र यामध्ये गरीब मुलांसाठी नेचर पार्क ,बॉटनिकल गार्डन ,प्राणी संग्रहालय निर्माण करावे अशी मागणी शाळाकडून केली जात आहे .डोंबिवली पूर्वेकडील सागाव परीसारतील जय भारत इंग्लिश स्कूल व इम्पकट या सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षक  विद्याथी पालिका मुख्यालयात दाखल झाले .विशेष म्हणजे या स्मार्ट सिटी मध्ये नेचर पार्क ,बॉटनिकल गार्डन ,प्राणी संग्रहालय बनवावे या मागणी कडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या विद्यार्थ्यांनी प्राण्यांची वेशभूषा केली होती .यावेळी या शिष्ट मंडळाने पालिका उपायुक्त विजय पगार यांची भेट घेत मागणीचे निवेदन सादर केले .यावेळी प्रशासनाने याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email