विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग मानव जातीच्या कल्याणासाठी व्हावा – उपराष्ट्रपती समाजाच्या लाभासाठी इस्रोने दूरदृष्टीने संशोधन प्रकल्प हाती घ्यावे

नवी दिल्ली, दि.२४ – सर्व गोष्टींची अद्ययावत माहिती आणि आकडेवारी देण्यात वैज्ञानिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, असे सांगत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य विशेषत: शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केला जावा, असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. हैदराबाद येथील एनआरएससी म्हणजेच राष्ट्रीय दूरस्थ संवेदना केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण आणि शहरी विकासासाठी अवकाश तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या अद्ययावत सुविधा इस्रोकडे आहेत. त्याशिवाय संवाद आणि दूरस्थ संवेदना उपग्रहांसह इस्रोकडे अद्ययावत अवकाश तंत्रज्ञान आहे. याचा उपयोग देशाच्या विशेषत: ग्रामीण भागाच्या विकासासाठी करायला हवा. सरकारच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या माहितीचा आणि संसाधनांचा अधिकाधिक उपयोग केल्यास त्याचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील, असे ते म्हणाले.

देशात जलसंवर्धन करण्यास सरकारचे प्राधान्य असून पाणलोट विकासाची कामे आणि कृषी सिंचन योजना योग्य प्रकारे राबविल्या जात आहेत की नाही तसेच त्यांचा प्रभाव याचे निरिक्षण करण्यासाठी उपग्रहांनी मिळवलेल्या माहितीचा उपयोग होतो, असे ते म्हणाले. सरकारच्या पथदर्शी योजनांच्या अंमलबजावणी एनआरएससीची महत्त्वाची भूमिका आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email