विजेचा शॉक लागून एका 23 वर्षीय इलेक्ट्रिशियनचा मृत्यू
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात विजेचा शॉक लागून एका 23 वर्षीय इलेक्ट्रिशियनचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोहम्मद नसीम अली असं मृत तरुणाचं नाव असून तो शिवडी परिसरात राहत होता.सिद्धिविनायक मंदिरात विजेच्या वायरिंगचं काम सुरु होतं. हा तरुण कॉन्ट्रॅक्टरसोबत काम करण्यासाठी मंदिरात गेला होता. पण मंगळवारी रात्री उशिरा मंदिरातील एका लोखंडी पाईपमध्ये वीज वाहत असताना, या पाईपच्या संपर्कात आल्याने मोहम्मद अलीला शॉक लागला .मोहम्मदला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.दादर पोलिसांनी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी मृत मोहम्मद अलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
Please follow and like us: