विजय नगर येथील दोन युवकांचा वाहन अपघातात दुदैवी मुत्यु
कल्याण – विजयनगर कल्याण पूर्व येथे रहाणाऱ्या दोन युवकांचा टू व्हीलर अपघातात दुदैवी मुत्यु झाला आहे. विजयनगर रिक्षा स्टॅंड च्या बाजुला असलेल्या चाळीत रहाणारा कुमार सन्मय चव्हाण वय वर्ष २४ आणि मयुर काळे वय वर्ष २३ हे काही कामा निमित्त ठाण्याला गेले होते. परतीच्या प्रवासात ठाणे सानपाडा दरम्यान त्यांच्या बाईकला एका आज सकाळी पावणे चारचे सुमारास आठचे दरम्यान टेम्पोने जोराची ठोकर दिली या अपघातात हे दोन्ही युवक जागीच मृत्युमुखी पडले. एकाच परिसरातील दोन युवकांच्या अपघाती निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
Please follow and like us: