वाचनामुळेच माझे लेखन समृद्ध झाले ; ज्येष्ठ साहित्यिका वीणा गवाणकर
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – मैदानी खेळात लहानपणी मी कधीही रमले नाही. खेळाऐवजी पुस्तकांचे विपूल वाचन केले. वाचनांची आवड असल्याने मुलांनाही मी छोटी-छोटी चरित्र विकत आणून देत असत. आत्मचरित्र आणि व्यक्ती चित्रण वाचायला मला खूप आवडत असत. कार्व्हर ही एक वृत्ती आहे. कार्व्हर वाचल्यावर तो मुलांना सांगितले पाहिजे, असे वाटले. त्यातूनच एक होता कार्व्हर हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. वाचनामुळेच माझे लेखन समृद्ध झाले, अशी कबुली ज्येष्ठ साहित्यिका वीणा गवाणकर यांनी दिली.
श्री गणेश मंदिर संस्थान व पर्यावरण दक्षता मंडळाच्यातर्फे पर्यावरण कट्टा या अंतर्गत गवाणकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शुक्रवारी गणेश मंदिरात झाला. यावेळी गवाणकर म्हणाल्या, आजपर्यंत मला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. पण माझे बोलणे ऐकायला येणारा प्रेक्षक मला पुरस्कारांपेक्षा मोठा वाटतो. ज्यांच्याकडे काहीच नाही, त्याला शून्यातून जग निर्माण करायचे असते. ज्यांना आई-वडील नसतात त्यांना हे कर किंवा करू नको, हे कोण सांगणार. कोणतीही सबब त्यांना सांगता येत नाही. सद्या आई-वडील सांगतात त्याप्रमाणे मुले शिक्षण घेतात. त्यातही त्यांना करिअरच्या मोजक्याच वाटा माहीत असतात. पण मुलांनी निवडलेल्या करिअरमध्ये काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करावा. निर्णय घ्यायला शिकावे. आपण ही गोष्ट कशासाठी शिकतो, हे प्रथम ठरवावे. तुमच्या आजूबाजूलाही एखादा कार्व्हर असू शकतो. त्यामुळे कोणाची ही टिंगल उडवू नका. गरजवंताला मदतीचा हात द्या, असा सल्ला ही त्यांनी दिला. डोंबिवलीत झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांबरोबरच कट्याचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मुलाखतीत गवाणकर यांनी प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली.

Please follow and like us: