वाघ व बिबट्याची कातडी विकण्यास आलेली दुकली गजाआड 

डोंबिवली वाघ व बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या दोन जणांना कल्याण बदलापूर रोड येथील एका हॉटेल जवळून  कल्याण क्राईम ब्रांच व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी  सापळा रचून अटक केली. या दोघा जवळून  बिबट्यासह एका वाघ सदृश्य प्राण्याची कातडी जप्त करण्यात आली आहे . 

    विशाल धनराज व सचिन म्हात्रे अशी अटक आरोपींची नावे असून ते रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे राहणारे आहेत. कल्याण बदलापूर येथील समाधान हॉटेल नजीक दोन जन बिबट्याची कातडी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचला मिळाली होती .या माहिती नुसार कल्याण क्राईम ब्रांचच्या कल्याण क्राईम ब्रांच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन ,सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्योतीराम साळुंखे ,पोलीस शिपाई दत्ताराम भोसले ,नरेश जोग्मार्गे ,अरविंद पवार ,अजित राजपूत ,पोलीस नाईक राजेंद्र घोलप ,सुरेश निकुळे ,सतीश पगारे ,हरिश्चंद्र बांगरा ,वनपाल मुरलीधर जामकर ,वनरक्षक संतोष रेवने ,वनजीव रक्षक /अभ्यासक सुहास पवार या पथकाने या ठिकाणी सापळा रचला व दोन इसम संशयितरीत्या फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी या दोघांवर झडप घालत दोघांना अटक केली. अटक आरोपींच्या  विरोधात मानपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलिसांनी त्यांच्याकडून एक बिबट्याची व वाघसदृश्य प्राण्याची कातडी जप्त केली असून त्याची किंमत सुमारे १० लाखांच्या घरात आहे .दरम्यान हे कातडे त्यांनी जंगलात शिकार करून मिळवले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून हे कुणास विक्री करणार होते याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email