वसतीगृहात केअरटेकरनी अल्पवयीन मुलांवर केला अत्याचार

नवी मुंबई – वसतीगृहात तीन केअरटेकरनी अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. ११, १२ व १७ वर्षाच्या तीन मुलांसोबत हा लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.

विक्रोळीमधील एक धर्मादाय ट्रस्ट हे वसतीगृह चालवतं. वसतीगृहात फक्त मुलांच्या राहण्याची सोय केली जात नसून त्यांचा शिक्षणाचाही खर्च केला जातो. पीडित मुलं कळंबोलीमधील एका खासगी शाळेत शिकत होती. यामधील १७ वर्षीय मुलाला ऐकण्याचा त्रास आहे. मुलं सुट्टीसाठी घरी परतल्यानंतर आश्रमात पुन्हा परत जाण्यास नकार देऊ लागल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ‘जेव्हा त्यांच्या पालकांनी आश्रमात पुन्हा का जाणार नाही अशी विचारणा केली तेव्हा मुलांनी फेब्रुवारी महिन्यापासून केअरटेकर आपल्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत असल्याचं सांगितलं. कळंबोली पोलिसांनी सोमवारी रात्री त्या तिघां मधल्या दोन केअरटेकरना अटक केली आहे. तिसरा केअरटेकर उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपल्या घरी गेला होता, तो अद्याप परतलेला नाही.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email