वन्दे मातरम् ला विरोध करणारा एआयएमआयएम चा नगरसेवक जफर शेख,ट्रकचोर

गेल्या वर्षी औरंगाबाद नगरपालिकेच्या महासभेत वन्दे मातरम् ला विरोध करणारा एआयएमआयएम चा नगरसेवक जफर अख्तर शेख याला ट्रकचोरी प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे.त्याचा भाउही याप्रकरणात आरोपी आहे.
भिवंडी क्राइम ब्रांच यूनिट २ ने १५ दिवसांपूर्वी चोरीचे ट्रक नकली कागतपत्रे बनवुन विकारा-या टोळीतील सदस्यांना पकडले होते.याच प्रकरणी मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे.यापूर्वी त्याचा भाऊ बाबर शेख याला पोलिसांनी अटक केली होती.त्याची चौकशी केली असता जफर अख्तर शेख याचं नाव आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.तसचं त्याच्या परिवारातील अन्य दोन सदस्यांचा यात सहभाग असल्याची चौकशी पोलीस करत आहेत. भिवंडी अपराध शाखा यूनिट २ ने जफ़र अख्तर शेख याला भिवंडी न्यायलयात हजर केले असता न्यायलयाने त्याला १४ में पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

२६ एप्रिल२०१६ ला याच जफर शेखने औरंगाबाद मनपामध्ये भाजपा शिवसेना नगरसेवकांच्या वन्दे मातरम् म्हणण्याला विरोध केला होता.यासंदर्भात जफर शेख सहित इतर दोन नगरसेवकाना एक दिवसासाठी निलंबितही करण्यात आलं होतं.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email