लोकल ट्रेनच्या टपावर चढणे तरुणाला पडले महागात
मुंबई – अनेकदा गर्दी टाळण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवासी टपावर चढून प्रवास करतात. त्यातून त्यांचे मृत्यू झाल्याच्याही घटना समोर येतात. अशीच एक घटना मुंबईत मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात घडली. एका तरुणाला लोकल ट्रेनच्या टपावर चढल्याने वीजेचा जबरदस्त धक्का बसल्याची घटना समोर आली असून त्याचे नाव काय आहे ते अद्याप समजू शकलेले नाही. हा तरूण नेमका लोकलच्या टपावर का चढला होता हे समजू शकलेले नाही. मात्र त्याला उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Please follow and like us: