लॉजमध्ये चालणाऱ्या देहविक्रय व्यवसायावर धाड, दोन पीड़ित मुलींची सुटका

बदलापूर – ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने बदलापूर येथील एका लॉजमध्ये चालणाऱ्या देहविक्रय व्यवसायावर धाड टाकली व दोन पीड़ित मुलींची सुटका करण्यात केली.याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून न्यायालयाने दोन्ही आरोपींना २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बदलापूर येथील कर्जत रोडवरील जुन्या पेट्रोलपंपासमोर असलेल्या हॉटेल वेंकिज लॉजिंगवर ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी धाड टाकली. या चार मजली इमारतीचा तळ मजला आणि पहिला मजला हॉटेलसाठी वापरला जात होता. उर्वरित तीन मजल्यांवरील ३० खोल्यांमध्ये लॉजिंगच्या नावाखाली देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सायंकाळी धाड टाकून लॉजचा व्यवस्थापक राकेश किसनमोहन कैथ आणि वेटर गणेश मल्लिकार्जुन कलशेट्टी यांना अटक केली.पोलिसांनी धाड टाकून देहविक्रय करणा-या  दोन मुलींना ताब्यात घेतले.याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे.
लॉजवर चालणा-या अनैतिक धंद्याचे उत्पन्न थेट मालकाला मिळायचे. या उत्पन्नाचा निम्म्यापेक्षा कमी वाटा तो पीडित मुलींना द्यायचा. त्यामुळे मालकाचा या गुन्ह्यामध्ये थेट सहभाग असल्याने मालक आणि लॉजच्या चालकाचा शोध घेत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email