लिंगबदलासाठी कुटुंबीयांनी परवानगी न दिल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

चेन्नई – लिंगबदलासाठी कुटुंबीयांनी परवानगी न दिल्याने एका विद्यार्थिनीने हॉस्टेलच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी आत्महत्या केल्याची घटना  चेन्नई येथे घडली.सुत्रांच्या सांगण्यानुसार या 22 वर्षीय विद्यार्थिनीला लिंगबदल करुन पुरुष व्हायचं होतं, पण कुटुंबीयांनी तिला परवानगी दिली नाही.

कुटुंबीयांनी लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेला परवानगी न दिल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचललं. याआधी लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती मिळवण्यासाठी ती एका डॉक्टरकडे गेली होती. पण कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय ही शस्त्रक्रिया करता येणार नाही, असं डॉक्टरने तिला सांगितलं. यासाठी तिने अनेकदा आई-वडिलांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला होता. सोमवारी हॉस्टेल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेली आणि तिथून उडी मारली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email