लाच प्रकरणी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून डॉक्टर निलंबित

नवी मुंबई:-  महानगरपालिकेच्या सार्वजनिक रूग्णालय, वाशी येथे कार्यरत वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन तुकाराम वाघमारे यांनी शरीरात अल्कोहोल नसल्याचा दाखला देण्यासाठी 4 हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने तसेच त्यांच्याविरूध्द वाशी पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन 1988 चे कलम 7  प्रमाणे गुन्हा गु.र.नं. 189/2018 दाखल करण्यात येऊन या गुन्ह्याच्या तपासकामी त्यांनी ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबई यांनी कळविले आहे. असे अशोभनीय कृत्य करून महानगरपालिकेची प्रतिमा मलीन केल्याच्या गैरवर्तनाची गंभीर दखल महापालिका आयुक्त डॅा. रामास्वामी एन. यांनी  घेतली असून त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे.

महानगरपालिका प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असे नमूद करीत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी यापुढे देखील गैरप्रकार व कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी अधिकारी  / कर्मचाऱ्यांवर तातडीने प्रशासकीय  कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.  पारदर्शी, लोकाभिमुख व गतिमान प्रशासन राबविण्यासाठी आपण कृतीशील असून यामध्ये नागरिकांनी देखील महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॅा. रामास्वामी एन. यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email