लाचखोर घरतला १९ ता पर्यंत पोलीस कोठडी ,मोबाईल पासवर्ड दिला नाही

डोंबिवली – कल्याण डोंबिवली महापालिकेचा लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत व इतर दोन साथीदारांना आज कल्याण न्यायालयात पुनः हजर केले असता न्यायालयाने त्या तिघांना १९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
आज घरत व इतर दोघांना कोर्टात आणले असता त्यांना भेटण्यासाठी त्याचे अनेक समर्थक कोर्टात हजर होते. घरत यांनी २७ गावातील सात मजली इमारत वाचवण्यासाठी ४२ लाख रुपये लाच मालकाकडे मागितली व ३५ लाख तफजोड झाली त्यातील ८ लाख रुपये घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आले होते. त्यावेळी त्यांना कोर्टात उभेकेले असता १७ ता पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. पोलिसांनी घरत अजून चौकशीला सहकार्य करत नाहीत व मोबाईल पास वर्ड देत नसल्याने पोलीस कोठडीची मागणी केली. त्याला त्याच्या वकिलांनी विरोध केला व ते मोबाईल घरत याचे नाजीत त्यामुळे पास वर्ड देण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून त्याला न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने घरत व इतर दोघांना १९ पर्यंत पोलीस कोठडी दिली.
दरम्यान पोलिसांनी अजून पालिकेला अहवाल न दिल्याने अजून त्यांना निलंबित करण्यात आले नाही. उद्या सोमवारी निलंबनाची कारवाई होईल असे सांगण्यात आले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email