लवरात्रीचे चित्रपटाचे नाव लवयात्री होणे, हा हिंदूंच्या संघटित शक्तींचा परिणाम ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या पवित्र अशा नवरात्री उत्सवाच्या काळात आणि नवरात्री या नावाशी साधर्म्य असलेला लवरात्री हा हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्याचा घाट सिनेअभिनेता सलमान खान यांनी घातला होता. या विरोधात हिंदु जनजागृती समितीसह भारतभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रस्त्यावर उतरून वैध मार्गाने आंदोलने केली, तसेच गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड), प्रशासकीय अधिकारी, मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदने देण्यात आली होती.

यासमवेतच बिहारमधील अधिवक्ता सुधीरकुमार ओझा यांनी मुझफ्फरपूर येथील न्यायालयात या चित्रपटाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी याचिका दाखल केली होती आणि न्यायालयानेही पोलिसांना सलमान खान यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. एकूणच या सर्वांचा परिणाम म्हणूनच सलमान खान यांनी चित्रपटाचे नाव लवरात्रीवरून लवयात्री असे पालटले. हिंदूंच्या संघटित आणि वैध मार्गाने केलेल्या आंदोलनाचाच हा परिणाम असल्याचे मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी व्यक्त केले.

सलमान खान यांनी जसे हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर का होईना हिंदूंच्या धर्मभावनांची दखल घेतली, तशी चित्रपट सृष्टीतील अन्य निर्मात्यांनीही घ्यावी, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले. ते पुढे म्हणाले की, चित्रपटाचे नाव पालटले हे योग्य असले, तरी आम्ही प्रत्यक्ष चित्रपट पाहिलेला नाही. त्यामुळे चित्रपटात जर हिंदूंच्या देवता, धर्म, सण यांच्या संदर्भात आक्षेपार्ह संवाद, चित्रण असेल, तर त्याविरोधात पुन्हा आंदोलन छेडले जाईल, अशी चेतावणीही श्री. शिंदे यांनी दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email