लघुशंकेसाठी खाली उतरलेल्या रिक्षा चालकाची रिक्षा चोरली
डोंबिवली – कळवा परिसरातील खारे गाव परिसरात रहाणारे अमितकुमार सिंग हे रिक्षा चालक असून रिक्षा चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात .शनिवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास सिंग डोंबिवली बावनचाळ येथे भाडे सोडून पुन्हा परतत असताना त्यांनि लघु शंके साठी रिक्षा एक कोपऱ्यात उभी करून ते खाली उतरले .या संधीचा फायदा घेत दोन अज्ञात चोरट्यानी त्यांची रिक्षा घेऊन तेथून धूम ठोकली .रिक्षा चोरी गेल्याचे समजल्याने त्यांनी य प्रकरनि त्यांनी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे .
Please follow and like us: