लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार – डोंबिवलीतील घटना
कल्याण दि.२३ – लग्नाचे आमिष दाखवत सोबत राहण्यास भाग पाडत शरीरसबंधास नकार देणाऱ्या पिडीतेला मारहाण करत मानसिक त्रास देत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिडीतेने मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अभिषेक चौधरी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
हेही वाचा :- पाहुण्याने घरातील सोन्याच्या दागिन्यांवर मारला डल्ला – डोंबिवलीतील घटना
सदर पिडीत तरुणी मुंबई मिरारोड येथे राहते तिची डोंबिवली मिलाप नगर येथे राहणाऱ्या अभिषेक चौधरी याच्याशी ओळख होती याच ओळखीचा फायदा घेत अभिषेक ने तिच्याकडे लग्नासाठी तगादा लावला व तिला लग्न करणार असल्याचे आमिष दाखवत आपल्या सोबत राहण्यास भाग पाडले. अभिषेक ने सदर पिडीतेकडे शरीर संबंधांची मागणी केली मात्र पिडीतेने नकार देत विरोध केला असता त्याने तिला शिवीगाळ मारहाण करत तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
हेही वाचा :- टेम्पो ची रिक्षाला धडक ,महिला प्रवाशी जखमी – डोंबिवलीतील घटना
तरुणीने त्याला लग्ना बाबत विचरले असता त्याने नकार देताच तिला आपली फसवणूक झाल्यचे लक्षात आले पिडीतेने या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अभिषेक विरोधात गुन्हा दखल करत पुढील तपास सुरु केला आहे.