रेल्वे सुरक्षा रक्षकाच्याच घराची घरफोडी !
प्रभाग क्र .८९ मंगल राघोनगर मध्ये एका चाळीत रहाणारे रेल्वे सुरक्षा रक्षक डी .टी. राम याच्या घराची घरफोडी झाली आहे . राम हे आपल्या कुटूंबीयांसह दि . १८ फेब्रुवारी रोजी गावी गेले आहेत तेव्हा पासुन त्यांच्या घराला कुलुप होते . परंतु काल सायंकाळी ७ चे सुमारास त्यांच्या शेजारी रहाणाऱ्या एका महिलेला राम यांच्या घराचे दार उघडे असून आतील सर्व सामान अस्त व्यस्त पडल्याचे दिसून आले .
या घटनेची खबर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर घटना स्थळी पोलीसांनी येऊन श्री राम यांचेशी फोन वरुन संपर्क साधला असता या चोरीच्या घटनेत कोणत्याही प्रकारचा मुद्देमाल चोरीला गेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे . असे असले तरीसुद्धा रघुनाथ अपार्टमेंटच्या बाजुला भर नागरी वस्तीत चोरट्यांनी घर फोडण्याचे धाडस केलेच कसे या बाबत येथील रहिवाश्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून या चोरीबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत .
Please follow and like us: