रेल्वे रूळ ओलांडताना एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
मुंबई- रेल्वे रूळ ओलांडताना एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सागर संपत चव्हाण (23), साईप्रसाद मनोहर चव्हाण (17), मनोज दीपक चव्हाण (17), दत्तप्रसाद मनोहर चव्हाण (20) अशी या चौघा मृतांची नावं आहेत.यातील सागर हा कांदिवलीला राहणारा तर इतर तिघं कणकवलीचे रहिवासी होते. सागरच्या घरी जाण्यासाठी सगळे निघाले होते. त्यावेळी बोरिवलीला ट्रेनने जाताना पोईसर- कांदिवली येथिल सिग्नलला लोकल थांबली. यावेळी त्यांनी ट्रेनमधून उड्या मारल्या व ट्रॅक ओलांडत असताना चर्चगेटहून येणाऱ्या गाडीची धडक त्यांना बसल्याचे सांगितले जाते.
Please follow and like us: