रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसाठी ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील फाटक बंद
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसाठी ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील फाटक दोन दिवसांपासून बंद करण्यात आले आहे. रुळाच्या आतील खडी काढण्यात आली असून त्यामुळे फाटक ओलांडून जाणे प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याने ते छोटेसे फलक लावण्यात आले आहे. मात्र फलक दिसत नसल्याने नागरिक रूळ ओलांडून ये-जाकरत होते. स.वा.जोशी येथील उड्डाणपूलाच वापर वाहनचालक करत असल्याने वाहतूकीस अडथळा आला नाही.
ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील ५ नंबर येथील रुळाच्या दुरुस्तीचे काम १० तारखेपासून सुरु झाले आहे. रूळामधील खडी बाहेर काढण्यात आली आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र नागरिकांना याची माहिती देण्यासाठी फाटकाला लावलेले फलक अत्यंत छोटे असल्याने नागरिक याकडे पाहत नव्हते. ज्येष्ठ नागरिकापासुन तरुण मुले-मुली पुलाचा वापर न करता सदर रूळ ओलांडून ये- जा करत होते. मात्र नागरिकांना अडविण्यासाठी सदर ठिकाणी एकही रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान दिसले नाही. काही जागरूक नागरिकांनी पुढे येऊन रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या नागरिकांना ओरडत होते. या` दरम्यान जवळील स.वा. जोशी उद्दन्पौलाचा वापर वाहनचालकांनी केला असल्याने वाहतूक कोंडी झाली नाही.