रेलरोको मागे ,मध्य रेल्वे वाहतुक सुरु
विस्कळीत झालेल्या वाह्तुकीने प्रवासी त्रस्त
मुंबई – विद्यार्थ्यांनी केलेल्या रेलरोको आन्दोलनामुळे आज प्रवाशांचे अतोनात हाल झाले.अधिकारी व विद्यार्थी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अखेर हा रेलरोको मागे घेण्यात आला.व रेल्वे सेवा पुर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.
मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे सेवा आज विद्यार्थ्यांच्या आंदोलानामुले विस्कळीत झाली होती.दादर माटुंगा दरम्यान रेल्वे अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांनी आन्दोलन करत रेल्वे वाहतुक सुमारे साडेतीन तास अडवून ठेवली होती.यामुळे रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती.प्रवाशांनाही याचा मोठ्या प्रमाणात त्रास झाला.अधिकारी व विद्यार्थी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अखेर हा रेलरोको मागे घेण्यात आला.विद्यार्थी ट्रॅकवरून हटल्यानंतर रेल्वे मार्ग मोकळा झाला व रेल्वे सुरू करण्यात आल्या.
Please follow and like us: