रेड बुल म्युझिक आयोजित डी. वाय. पाटील कॉलेजच्या ‘औरा’ फेस्टिवमध्ये न्युक्लियाच्या म्युझिकवर थिरकली तरुणाई

न्युक्लियाच्या म्युझिकवर थिरकली तरुणाई

नवी मुंबई – काल बुधवारची सोनेरी संध्याकाळ आणि तरुणाईने खचाखच भरलेले डी वाय पाटील कॉलेजचे मैदान त्यातच ‘औरा’चा वार्षिक महोत्सव असा त्रिवेणी संगम साधत भारताचा बास ऑफ व्हॉईस म्हणून परिचित असलेल्या न्युक्लियाच्या गाण्यावर सात हजार तरुणाईने संध्याकाळचे चार तास मनमुराद आनंद लुटला. रेड बुल म्युझिकने आयोजित केलेल्या या म्युझिक कॉन्सर्टमधील आकर्षक रोशणाई आणि पाश्चात्य गितांचा अविस्मरणीय आनंद नवी मुंबईतील तरुणाईने काल घेतला.

 

 नेरुळच्या डि. वाय. पाटील कॉलेजचा ‘औरा’ ह्या वार्षिक महोत्सवात रेड बुल म्युझिकने आयोजित केलेल्या न्युक्लिया ऍण्ड व्हाईसव्हर्सा हा म्युझिक कॉन्सर्ट मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या ठिकाणी न्युक्लिया आणि व्हाईसव्हर्सा बॅंडचे आगमन होताच सर्व तरुणाईने हात उंचावून आणि टाळ्या वाजवून त्यांचे नेरुळ नगरीत स्वागत केले. या कार्यक्रमाला बंगळूरु स्थित संगीतकार मानस उल्हास, मुंबई स्थित संगीतकर रोहित परेरा ऊर्फ पी-मॅन आणि सिद्द कोउटो यांचा समावेश असलेल्या व्हाईसवर्सा या हिप-हॉप/बास/रॉक आणि रोल बॅंडने सुरुवात केली. यावेळी त्यांनी त्यांची काही लोकप्रिय गाणी या त्यांच्या चल हट, ऑल आय नीड आणि रावडी लोकप्रिय गाण्यांसहित सादर केली.

व्हाईसवर्सा बॅंडकडून सूत्र नुक्लीयाने हाती घेत स्टेजवर प्रवेश केला तेंव्हा प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. भारताचा बास ऑफ व्हॉईस म्हणून परिचित असलेल्या न्युक्लियाने लॉंग गव्च्छा, अक्कड बक्कड, सिन क्या हे, जंगली राजा ही गाणी गाऊन त्याने तरुणाईला आपलेसे केले. तर बंगला बास ह्या त्याच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता केली. ज्याला उपस्थितांकडून मनापासून प्रतिसाद मिळाला. भारतातही लोकप्रिय ठरलेल्या न्युक्लियाने रेड बुल म्युझिकने आपल्याला ही संधी दिल्याबद्दल त्याने त्याच्या गाण्याच्या शैलीतच आभार व्यक्त केला.

पुढच्या रेड बुल म्युझिक शोमध्ये आयकॉनिक रॉक बॅंड, पेन्टाग्राम आणि डीजे प्रोड्युसर गुर्बक्स, रेड बुल म्युझिक प्रेसेंट्स पेन्टाग्राम आणि गुर्बक्स मध्ये एमजेसी ग्राउन्ड्स, मणिपाल येथे 24 मार्च रोजी होणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email