रूमचे आमिष दाखवत महिलेला लाखोंचा गंडा
डोंबिवली : रूमचे आमिष दाखवत एका महिलेला कथित बिल्डरने ३ लाख १२ हजाराना गंडा घातल्याची घटना उजेडात आली आहे .या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात महेश खवटगोप विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
कल्याण पुर्वेकडील लोकग्राम परिसरात महेश खवटगोप याचे साई सिद्धी बिल्डर्स डेव्हलपर्स नावाने कार्यलय आहे. २०१४ साली मुंबई येथे राहणाऱ्या अंजू मारू याना खवटगोप याने तुम्हाला २ बीएचके रूम देतो असे आमिष दाखवले .स्वस्तात रूम मिळेल या आशेने या महिलेने खवटगोप यांला तीन वर्षात एकूण ३ लाख १२ हजार २०० रुपये चेक व रोकड मिळून देऊ केले .त्यानंतर खवटगोप याने मारु याना नोटरी करून दिली .मात्र पैसे देऊन बराच कालावधी लोटला मात्र रूम न मिळाल्याने मारू याना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले याबाबत त्यांनी खवटगोप याना विचारले असता उडवा उडवीची उत्तरे दिली .या प्रकरणी या महिलेने खवट गोप विरोधात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसर पोलिस्नी कथित बिल्डर खवटगोप व त्याच्या सहका-याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us: