रिक्षा थांबवण्यास सांगणाऱ्या वाहतूक पोलीसाला दिली धडक
रिक्षा चालकाची मुजोरी वाहतूक पोलीसाला दिली धडक
डोंबिवली – डोंबिवली स्टेशन परिसरात एका अल्पवयीन रिक्षा चालकाने वाहतूक नियोजनाचे काम करणाऱ्या एका वाहतूक पोलिसाला धडक दिल्याची घटना घडली असून या अल्पवयीन रिक्षा चालकाविरोधात विष्णू नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आहे .दरम्यान विना परवाना ,वाहतूक नियमांचे उल्लंघन करत रिक्षा चालवत प्रवाशांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या रिक्षा चालकाविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे.
कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालकाची मुजोरी दिवसागणिक वाढत चालली असून प्रवाशासोबत अरेरावी करणार्या रिक्षा चालकांची मजल आता तर पोलीस कर्मचा-यांवर हात उचलणे त्यांना धडक देण्यापर्यंत गेली आहे .अशी एक घटना डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात घडली आहे . डोंबिवली वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलीस शिपाई संतोष ठाकूर हे काल सात वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन समोरील वाहतूक नियोजनाचे काम करत होते यावेळी त्यांनी एका रिक्षा चालकाला थांबण्याचा इशारा केला मात्र संतापलेल्या या रिक्षा चालकाणे रिक्षा भरधाव वेगाने चालवत ठाकूर यांना धडक दिली या अपघातात ठाकूर जखमी झाले असून त्यांनी या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात रिक्षा चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे ..धक्कादायक बाब म्हणजे सदर रिक्षा चालक अल्पवयीन असल्याची माहिती उघड झाली आहे.