रिक्षा चोरली
डोंबिवली – कल्याण पूर्वेकडील काटेमानवली परीसरात सम्यक कल्पतरू चाळीत राहणारे विजय गांगुर्डे हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात .मंगळवारी रात्री ते आपली रिक्षा नूतन शाळेसमोर रस्त्यावर उभी करुन निघून गेले यावेळी अज्ञात चोरट्याने ही रिक्षा चोरून नेली .सकाळी रिक्षा नसल्याने त्यांनी रिक्षाचा शोध घेतला मात्र रिक्षा न सापडल्याने अखेर या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us: