रिक्षा चालकाची पादचाऱ्याला मारहाण
डोंबिवली – भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाचा धक्का लागल्याने सदर रिक्षा चालकाला जाब विचारण्यास गेलेल्या शेतकऱ्याला सदर रिक्षा चालकाने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवली नजीक खोनि गावात घडली आहे .या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात रिक्षा चालक विशाल भिंगारदेव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
डोंबिवली नजीक असलेल्या खोणी गावात राहणारे परशुराम ठोंबरे हे शेतीचा व्यवसाय करत असून ते काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरासमोरील रस्त्याच्या कडेला उभे होते यावेळी विशाल भिंगारदेव हा रिक्षा चालक भरधाव वेगाने रिक्षा घेउन आला .ठोंबरे यांना रिक्षाची धडक लागल्याने त्यांनी विशालला रिक्षा नीट चालवता येत नाही का असा जाब विचारला. त्यामुळे संतापलेल्या विशालने रिक्षातील लाकडी दांडका काढत ठोंबरे यांना बेदम मारहान केली. या मारहाणीत ठोंबरे यांना दुखापत झाली आहे .या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात अली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी विशाल भिंगारदेव या रिक्षा चालका विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.