रिक्षाचालकाला सावकाराकडून कर्ज घेणे पडले महाग – डोंबिवलीतील घटना

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२६ – सावकाराकडून घेतलेले १० हजार रुपये कर्ज एका रिक्षाचालकाच्या जीवावर बेतले. त्याच्याकडून कर्जवसुलीसाठी होत असलेल्या जबरदस्तीने मानसिक धक्का बसल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मंदार लाड असे रिक्षाचालकाचे नावअसून ते डोंबिवली पूर्वेकडील आयरे रोड परिसरात राहतात. रिक्षा चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. लाड यांनी सावकाराकडून १० हजार रुपये कर्ज घेतले होते. कर्जवसुलीसाठी सावकाराकडून लाड यांच्याकडे तकादा लावला होता. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास खांबालपाडा पेट्रोलपंपावर गेले असता सावकाराचा वसुलीदार

अविनाथ चोपळे यांनी दमदाटी केली.आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कर्जाची रक्कम थोड्या दिवसात देतो असे लाड यांनी सांगूनही अविनाथ एकत नव्हता. लाड यांच्या रिक्षाची चावी कडून घेतली. घाबरलेले लाड यांनी मानपाडा पोलीस ठाणे गाडले. परत पेट्रोलपंपावर आले असता आपली रिक्षा अविनाथ घेऊन गेल्याचे पाहून लाड यांना धक्का बसला. लाड यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अविनाशला अटक केली आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email