रासायनिक कंपन्याचे सांडपाणी शुद्धीकरण करण्यासाठी परदेशी कंपनीचा शंभर कोटीचा प्रकल्प

डोंबिवली प्रदूषण मुक्त होणार 

(श्रीराम कांदु)
डोंबिवली –  डोंबिवलीतील  रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी शुध्दीकरण करण्यासाठी एका परदेशी कंपनीचा मोठा प्रकल्प एमआयडीसीत राबविला  जाणार आहे. त्यासाठी सुमारे शंभर  कोटीची गुंतवणूक आहे. या प्रकल्पात स्थानिक उद्योजकांच्या संस्थेचा सहभाग असून, रासायनिक कंपन्यांच्या सांडपाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होइल अशी माहिती पत्रकार परिषदेत डोंबिवली बेटर एनव्हायरोमेंट सिस्टीम  असोशिएशनचे पदाधिकारी यांनी दिली. कल्याण प्रेस क्लब व डोंबिवली पत्रकार संघटनेच्या वतीने सांडपाणी प्रकल्प पहाणी दौरा व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
    अमेरिकन स्थित सीएच टु एस व जेकब या एकत्रित कंपनीच्या वतीने सदर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. साधारणता एक वर्षापर्यंत या प्रकल्पाचे काम मार्गी लागणार आहे. यासाठी शंभर करोडची गुंतवणूक आहे. त्यातील पंचवीसटक्के रक्कम स्थानिक  उद्योजकानी उभी करायची  आहे. तर ७५%रक्कम एमआयडीसी, राज्यसरकार व केंद्र सरकार देणार आहे. प्रकल्प राबविणऱ्या अमेरिकन कंपन्यासोबत पाच वर्षाचा करार करण्यात येणार आहे.
 डोंबिवलीतील एमआयडीसी भागात अनेक रासायनिक व कापडप्रक्रिया उद्योग आहेत. या कंपन्यांचे सांडपाणी शुद्धीकरण करण्यासाठी एमआयडीसीची सामायिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र व उद्योजकांची डोंबिवली बेटर एनव्हायरोमेंट सिस्टीमअसोशिएशन  या काम करतात.या दोन्ही प्रकल्पाद्वारे कंपनीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नल्यावाटे समुद्रात सोडले जाते.पाण्यानंतर उरलेली मळी (स्लज) तळोजा येथील मुंबई वेस्ट मँनेजमेंट येथे पाठविली जाते.१२०,रासायनिक व ४० कापड प्रक्रिया उद्योग येथे आहेत.डोंबिवली बेटर एनव्हायरोमेंट सिस्टीम असोशिएशन सांडपाणी प्रकल्प विस्तीर्ण अश्या अकरा एकर जागेवर पसरलेला आहे.येथे दहा दशलक्ष सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते.या प्रकल्पात सुमारे १४८ उद्योजक सहभागी आहेत.आता १००%सांडपाणी व्यवस्थापन विविध कंपन्या करीत असल्याची महिती पत्रकारांना देण्यात आली.या पहाणी दौऱ्यात अत्यंत मोलाची माहिती सामायिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे व्यवस्थापक संचालक देवेन सोनी, उदय वालावलकर, निखिल धूत, सी एल कदम व डोंबिवली बेटर एनव्हायरोमेंट सिस्टीम असोशिएशनचे मुख्य अधिकारी राजेश दोशी, हेमंत भिडे, राजेश जालन, मनोज जालन यांनी पत्रकाराना माहिती दिली.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email