राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागसंघचालाक दादासाहेब कल्लोळकर यांचे निधन
डोंबिवली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालाक दादासाहेब कल्लोळकर यांचे आज ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.ते ७७ वर्षांचे होते.त्यांच्या निधानाच्या वृत्ताने शहरात सर्वत्र शोककळा पसरली होती.
अबालवृद्ध आशा सर्वांमधे मिसळण्याच्या त्यांच्या स्वाभावामुळे ते सर्वानाच प्रिय होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या येथील सर्व स्वयंसेवकही त्यांच्या या गुणांमुळे अधिक तन्मयतेने काम करीत असत.त्यांच्या निधानाच्या वृताने आज शहरात शोककळा पसरली होती.दादासाहेब कल्लोळकर ७७ वर्षांचे असुनही अतिशय कार्यतत्पर होते काल गणेश मंदिर संस्थान तर्फे झालेल्या आवर्तनालाही ते उपस्थित होते.त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना अपार दुःख झाले असून एक सातत्याने कार्य करणारे कार्यकुशल व्यक्तिमत्व गमावल्याची खंत सर्वत्र व्यक्त होते.
Please follow and like us: