राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते निरंजन डावखरे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश
मुंबई – कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी आज भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.याप्रसंगी मंत्री चंद्रकांत दादा पाटिल आणि भिवंडीचे भाजपा खासदार कपिल पाटील व भाजपा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.राष्ट्रवादीच्या एका गटाकडून आपल्याला सातत्याने स्थानिक स्तरावर डावलले जात होते. अखेर या स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसबाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे मत आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडताना व्यक्त केले होते.तर भाजपात सामाजिक कार्य करणा-यांसाठी उज्वल भविष्य असल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचे सांगितले.
Please follow and like us: