राष्ट्रवादीने केला वंदना टॉकिज फ्लाय ओव्हरचा लोकार्पण

ठाणे – आग्रा रोड येथे उभारण्यात आलेला उड्डाणपूल पूर्णपणे तयार झालेला असतानाही त्याचे उदघाटन करण्यात आलेले नाही. त्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहावे लागत आहे. पालघर लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणुक आणि आता कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता यामुळे या पुलाचे उदघाटन रखडले असल्याने राष्ट्रवादी ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक सुहास देसाईसह शेकडो कार्यकर्त्यांनी मखमली तलाव ते ठाणे वंदना टॉकिज दरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले.

दरम्यान, ‘ सेना-भाजपाच्या घरच्या भांडणात फ्लाय ओव्हर तयार असून देखील लोकार्पण न झाल्याने ठाणेकरांचे हाल होत होते. भाजपा-सेनेच्या नवरा-बायकोच्या भांडणाचा ठाणेकरांना त्रास होत असल्यानेच आम्ही या पुलाचे लोकार्पण केले आहे, असे यावेळी आनंद परांजपे यांनी सांगितले.
मीनाताई ठाकरे चौक, तीन पेट्रोलपंप, नौपाडा टेलिफोन एक्स्चेंज या तीन उड्डाणपुलांपैकी तीन पेट्रोलपंप म्हणजेच मखमली तलाव ते वंदना सिनेमापर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे.मात्र आधी पालकमंत्री पालघरच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने या पुलाचे उद्घाटन करण्यात आले नाही. आता तर कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीची आचारसंहिता लागल्याने तयार असलेल्या पुलाचे उदघाटन होणे अशक्य आहे. परिणामी सायंकाळच्या वेळी नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. दररोज वंदना सिनेमा आणि मखमली तलाव येथे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी आज (दि. 29) मखमली तलाव ते वंदना सिनेमागृह या पुलाचे उदघाटन केले. कार्यकर्त्यांनी आपल्या दुचाकी या पुलावरून नेऊन हा पूल जनतेसाठी खुला केला. त्यानंतर या पुलावरून वाहतूक सुरु झाली. यावेळी नगरसेवक सुहास देसाई,नगरसेवक. सुहास देसाई, कोपरी पांचपाखाडी विधानसभा अध्यक्ष नितीन पाटील , ठाणे शहर विधानसभाकार्याध्यक्ष विजय भामरे, ओ. बी. सी.सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर हेमंत वाणी, निलेश कदम, दिलीप नाईक, समीर भोईर, सुरेश सिंग, संतोष सहस्त्रबुद्धे, शैलेश कदम, सुमित गुप्ता, महेंद्र पवार, संदीप पवार आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

यावेळी आनंद परांजपे यांनी , ठाणेकर सध्या वाहतूक कोंडीने बेजार झाले आहेत. असे असताना पालकमंत्री ठाण्याचे असतानाही ते पालघरच्या निवडणूक प्रचारात गुंतले होते. त्यामुळे त्यांना उदघाटनाची वेळ नव्हता किंवा त्यांना जनतेचा हा प्रश्न महत्वाचा वाटत नव्हता. त्यामुळे त्यांनी या पुलाच्या उद्घाटनाला महत्व दिले नाही. आता तर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकांची आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे तयार असलेल्या पूलाचेही उदघाटन करणे शक्य होणार नाही. किंबहुना या सत्ताधार्यांना जनतेच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही. जनतेला वाहतूक कोंडीमध्येच ठेवण्याचे या सत्ताधार्‍यांचे धोरण आहे कि काय, असेच वाटत आहे. त्यामुळेच आम्ही जनतेसाठी हा पूल खुला केला आहे, असे सांगितले.
.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email