राणीच्या बागेत एका नवीन पाहुण्याचे आगमन या उद्यानातील हम्बोल्ट पेंग्विननं दिला पिलाला जन्म

मुंबई दि.१६ – मुंबई भायखळ्यातील वीर जिजामाता भोसले उद्यानात म्हणजेच राणीच्या बागेत एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. या उद्यानातील हम्बोल्ट पेंग्विननं पिलाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे भारतात प्रथमच पेंग्विनचा जन्म झाला असून राणीच्या बागेतील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

या मादी पेंग्विननं अंडं दिल्यानंतर राणीच्या बागेतील डॉक्टर पेंग्विनवर लक्ष ठेवून होते. या पेंग्विनच्या पिलाचा जन्म सुखरूप होण्यासाठी डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात होती. दोन वर्षांपूर्वी २६ जुलै २०१६रोजी राणीच्या बागेत हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले आहेत. तेव्हापासून हे पेंग्विन चर्चेचा विषय ठरत आहेत. दरम्यान, एका लहान मुलीने या पेंग्विनच्या पिलाचे नाव मीच ठेवणार असा हट्ट धरला आहे. मिश्का मांगुर्डेकर असे या मुलीचे नाव असून ती अंधेरी येथे राहते. मिश्काने राणीबाग प्रशासनाकडे आकर्षक नावांची यादीच पाठवली आहे. पेंग्विनचे पिल्लू नर असल्यास त्याचे नाव अपॉलो, कुकी, वॉडलर आणि मादी असल्यास तिचे नाव वेलव्हेट, व्हॅनिला, आईस क्यूब यापैकी ठेवण्याचा आग्रह मिश्काने धरला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email