राज्य शासनाच्या विरोधात १० हजार पेक्षा जास्त नागरिक रोष व्यक्त करणार..

डोंबिवली दि.२१ – २६ मे २०१६ रोजी डोंबिवली औद्योगिक विभागातील प्रोबेस कंपनीत प्रचंड स्फोट झाला होता.  या स्फोटात १२ जण दगावले तर २१५ जण जखमी झाले होते तर  ६६० बाधित झाले होते. या सर्व बाधिताना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  दिले होते पण सव्वा दोन वर्षे झाली तरी बाधिताना नुकसान भरपाई मिळावी  नाही.येत्या लोकसभा व  विधानसभा निवडणूकीपूर्वी जर बाधिताना नुकसान भरपाई  मिळाली नाही.
सुमारे १० हजार पेक्षा जास्त नागरिक राज्य शासनाच्या विरोधात रोष व्यक्त करणार आहेत.  डोंबिवली वेलफेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पत्र पाठवले असून त्याना वरील पत्र पाठवले आहे.
प्रोबेस  कंपनीत झालेल्या स्फोटामुळे २६६० बाधितांचे कोटयावधि रुपयांचे  नुकसान झाले असून राज्य शासनाने यासंदर्भात चौकशी समिती नेमली होती त्या समितीने नुकसान भरपाइ्र म्हणून ७ कोटी,४३ लाख २७ हजार रुपये प्रस्ताव केला असून अजून बाधितांना काहीच मिळाले  नाही याकडे त्यानी लक्ष वेधले आहे.
येत्या निवडणूकीपूर्वी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.  प्रोबेस कंपनीत वेल्डिंगच्या ठिणगीमुळे स्फोट झाल्याचे चोकशी समितीने मान्य केले असून ज्वलनशिल व अतिधोकादायक प्रेपार्जिल क्लोराईड रसायनामुळे हा स्फोट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.या चौकशी समितीत ७ जणांचा समावेश होता मात्र अजून या समितीचा अहवाल अधिकृत जाहीर करण्यात आला नाही.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email