राज्य राष्ट्रिय पुरस्कार वितरण सोहळयात डोंबिवलीतील कलाकारांचा गौरव
शहरातील कलाकारांचा उत्साह वाढला
कल्याण – महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाचा उपक्रम पर्यटन धोरण २००१८ अंतर्गत महाराष्ट्र राज्य पर्यटन कला व सामाजिक महोत्सव समिती आणि ठाणे जिल्हा पर्यटन कला व सामाजिक महोत्सव समिती यांच्या वतीने राज्य राष्ट्रिय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच कल्याण येथे संपन्न झाला. सामाजिक,सांस्कृतिक,कला,क्रिडा,उदयोग व आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणा-या मानक-यांना यात पुरस्काऱ देवून सन्मानीत करण्यात आले.या सोहळ्यामध्ये डोंबिवली शहरातील अनेक कलाकारांनाही गौरविण्यात आले.
कोरयोग्राफर महेश दवंडे, अभिनेते जॉनी रावत,अभिनेते रमेश जाधव,निवेदक प्रविण उर्फ शिवा गायकवाड,गायक संदिप कदम,गायक सुधीर केदारे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुरस्कार,प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक प्रविण उर्फ शिवा गायकवाड,यांनी केले तर या कार्यक्रमाची सुरुवात गायक संदिप कदम,यांच्या गायनाने करण्यात आली.सदर कार्यक्रमाला शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर सन्मानामुळे आपल्या कलागुणाना वाव मिळाला असून आम्हा कलाकारांची उमेद वाढली आहे.असं मत यावेळी कलाकरानी व्यक्त केले.त्याच प्रमाणे डोंबिवलीतील कलाकारांना प्राधान्य मिळावे यासाठी वारंवार धडपड करणा-या आधार इंडीयाचे अध्यक्ष व संस्थापक अमित दुखंडे यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले.