राज्याचे कृषि, फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
राज्याचे कृषि, फलोत्पादन मंत्री आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या पार्थिवावर आज खामगांव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीवेळी अंतिम दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रविण पोटे, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जि.प अध्यक्षा उमाताई तायडे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार सर्वश्री रावसाहेब दानवे, प्रतापराव जाधव, रक्षाताई खडसे, आमदार सर्वश्री चैनसुख संचेती, संजय कुटे, संजय रायमूलकर, हर्षवर्धन सपकाळ आदींसह कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, विभागीय आयुक्त पियुष सिंग, जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, पीकेव्हीचे कुलगूरू भाले, एमएसआरडीसीचे सहसंचालक चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते.यावेळी असंख्य चाहत्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला साश्रूनयनांनी निरोप दिला. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शना घेण्यासाठी कॅम्पस परिसरात त्यांच्याअसंख्य चाहत्यांनी गर्दी केली होती.