राज्याचे क़ृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

राज्याचे क़ृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते ६७ वर्षांचे होते. पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना बुधवारी मुंबईतील सोमय्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.फुंडकर यांनी तीन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी १९७८ आणि १९८० मध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. फुंडकर हे विधानपरिषदेतील विरोध पक्षनेतेही होते. ८ जुलै २०१६ रोजी त्यांनी फडणवीस मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email