राज्यभरात उन्हाचा पारा चढला.
तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातही उन्हाचा दाह कमी होताना दिसत नाहीये. दहा दिवसांपासून सोलापुरात तापमानाचा पारा 42 अंशांच्या वर चढला असताना त्यात आता आणखी भर पडतेय. रविवारी तर यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचं उच्चांकी तापमान होतं .43.5 अंश सेल्सियस इतकं हे तापमान नोंदवलं गेलं आहे. सूर्यनारायण तर अक्षरश: आग ओकतो की काय, अशी परिस्थिती सोलापूरकर अनुभवतायत.
चंद्रपुरातल्या कोळसा खाणी आणि वातावरणातलं प्रदूषण यामुळे इथलं तापमान नवे उच्चांक गाठत आहे. परिणामी अतिउष्ण झळा आणि उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे चंद्रपूरकर पुरते हैराण झाले आहेत. शहरातले रस्ते दुपारी निर्मनुष्य झालेले बघायला मिळताहेत. आवश्यक कामांसाठीच नागरिक घराबाहेर पडत असून, बाहेर पडतानाही कान-चेहरा रुमालानं झाकण्याची काळजी घेत आहेत.
राज्यभरातील तापमान
मुंबई (कुलाबा) 33.2,सांताक्रूझ 33.4,चंद्रपूर 46.4,ब्रम्हपुरी 46.0,नागपूर 45.2,वर्धा 45.8,अकोला 44.7,अमरावती 43.8,बुलढाणा 41.2,यवतमाळ 44.0,गडचिरोली 43.8,गोंदिया 42.5,अलिबाग 31.4,रत्नागिरी 33.6,पणजी (गोवा) 33.8,डहाणू 34.1,पुणे 40.4,अहमदनगर 43.7,जळगाव 44.4,कोल्हापूर 39.2,महाबळेश्वर 33.6,मालेगाव 44.2,नाशिक 39.6,सांगली 39.8,सातारा 40.3,सोलापूर 42.4,औरंगाबाद 41.6
Hits: 21