राजस्थानमधील अभूतपूर्व यशाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सचिन पायलट, अशोक गहलोत यांचे केले अभिनंदन

श्रीराम कांदू 

देशभरात विविध ठिकाणी झालेल्या पोट निवडणुकानंतर राजस्थानमधील दोन लोकसभा व विधानसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारांचा दारूण पराभव करित काँग्रेस उमेदवारांनी लाखोंच्या मताधिक्क्याने विजय मिळवल्याने काँग्रेसच्या पुनरागमनाची प्रक्रिया दणक्यात सुरु आहे. देशातले वातावरण झपाट्याने बदलत असून मोदींचे राज्य लवकरच खालसा होईल,अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

अजमेर आणि अल्वर या  दोन लोकसभा आणि मंडलगढ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी मिळवलेल्या दणदणीत विजयाबद्दल खा. अशोक चव्हाण यांनी राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले.

या संदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, भाजप सरकारने देशातील जनतेचा भ्रमनिरास केला असून भाजप सरकारच्या खोट्या आश्वासनांना आणि भाषणबाजीला देशातली जनता कंटाळली आहे. मोदी सरकारच्या घर वापसीची प्रक्रिया सुरु झाली असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष उभारी घेत आहे.  हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.  या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या मतांमध्ये 30 टक्क्य़ांची वाढ झाली आहे. हे देशातील बदलत्या हवेचे द्योतक आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत याआधीच हे स्पष्ट झाले होते असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. राजस्थानमध्ये येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष मोठा विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त करतानाच महाराष्ट्रातही अशाच त-हेचे जनमत गेल्या काही निवडणुकांमधून दिसून आले आहे. येत्या काळात महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता येणार आहे असा निर्वाळा खा. अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email