रागाच्या भरात केली शेजाऱ्याची हत्या

भिवंडी – पत्नीसोबत मोबाईलवर बोलत असताना शेजारी एका मुलाला पाहून जोरजोराने हाका मारु लागल्याने संतापलेल्या तरुणाने रागाच्या भरात शेजाऱ्याची हत्या केल्याची घटना भिवंडी शहरात घडली.

आशिषकुमार पत्नीसोबत मोबाईलवर बोलत असताना त्याचवेळी संजयनी ओळखीच्या एका मुलाला पाहून जोरजोराने हाका मारु लागला . संजयच्या आरडाओरड्यामुळे पत्नीशी मोबाईलवर बोलताना आशिषकुमारला अडथळा येत होता. रागाच्या भरात आशिषकुमारने लाकडी बॅटने संजयला मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण करतानाच बॅटचा जोरदार फटका संजयच्या डोक्यात बसला आणि त्याचा जागीच मृत्यु झाला. ही घटना भिवंडी शहरातील कैलासनगर परिसरात घडली असून नारपोली पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email