रस्ता रुंदीकरणासाठी डोंबिवलीतील आयरे गावात पालिकेची कारवाई
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – डोंबिवली पूर्वेकडील आयरे गावातील टावरे पाडा येथे रस्ता रुंदीकरणासाठी चाळीवर शनिवारी कारवाई करण्यात आली.कारवाई झालेल्या चाळकऱ्यांंना त्याबदल्यात मोबदला मिळणार असल्याचे स्थानिक नगरसेवक मंदार टावरे यांनी सांगितले. यापूर्वी टावरे यांनी येथील रहिवाश्यांची बैठका घेऊन त्यांना समजाविल्याने कारवाईला विरोध झाला नाही.
टावरे पाडा येथील गावठाण येथील ९ मीटर रस्त्यावर रुंदीकरण करण्यात येणार आहे. २००५ साली या रस्त्याला मंजुरी मिळाली होती. २०१६ साली येथील चाळकऱ्यांंना पालिका प्रशासनाने नोटीसा दिल्या होत्या. विशेष म्हणजे येथील स्थानिक नगरसेवक मंदार टावरे यांच्या घरापासून कारवाईला सुरुवात झाली. त्याच्या घराबाहेरील भिंत तोडण्यात आली. पोलीस बंदोबस्तात दोन जेसीबी सहाय्याने करवाई करण्यात आली. काही घरांचे पत्र्याचे शेड तोडण्यात आले आले तर काही घरांच्या भिंत तोडण्यात आल्या.कारवाईसाठी पालिकेचे कर्मचारी येणार म्हणून चाळक-यांनी कौले काढण्यास सुरुवात केली होती.नगरसेवक यांनी रहिवाश्यांना बैठका घेऊन समजूदारपणाची भूमिका घेतल्याने कारवाईला फारसा विरोध झाला नाही.ज्यांच्या घरातील ५० टक्के भागावर कारवाई झाली आहे त्या घरांचे पुर्नवसन करण्यात येणार असून काही घरांची २ फुट कारवाई गेली आहे त्यांना मोबदला दिला जाणार असल्याचे नगरसेवक टावरे यांनी सांगितले.