रविंद्र पाटील म्हणजे कार्यक्षम अधिकारी कसा असावा याचे उत्तम उदाहरण – विवेक भीमनवार

ठाणे दि २३ :  कार्यक्षम अधिकारी कसा असावा याचे उत्तम उदाहरण रविंद्र पाटील असून ठाणे जिल्हा परिषदेवर आलेल्या अनेक समस्यांना नेटाने सामोरे जात त्या समस्यांवर कायमस्वरूपी मात करण्याचे धारिष्ट्य त्यांनी दाखवले आहे. सर्वाना सोबत घेवून काम करण्याची त्यांची वृत्ती आणि प्रशासनाच्या विविध विषयांचे अवगत असणाऱ्या ज्ञानामुळे ते सर्वोत्तम प्रशासक असल्याची भावना ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील यांच्या निरोप समारंभात व्यक्त केली.  

मंगळवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात जि.प. च्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने पाटील यांच्या निरोप समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी विभागप्रमुख ,तसेच कर्मचारी वर्गाने त्यांच्या प्रति भावना व्यक्त केल्या. पाटील यांनी  7 ऑगस्ट २०१३ पासून ४ मे २०१८ पर्यंत जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी पदाची सूत्र यशस्वीरित्या सांभाळली. निरोप समारंभाला उत्तर देताना पाटील म्हणाले कि माझ्या  जि.प. च्या कारकिर्दीत सगळ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी कामांमध्ये मला उत्तम सहकार्य केले , प्रेम दिले त्या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो.

डॉ. दिलीप देशमुख नवे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

याप्रसंगी नव्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू झालेल्या डॉ. दिलीप देशमुख यांचे  स्वागत करण्यात आले. तसेच ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) म्हणून शेषराव बडे रुजू झाले आहेत त्यांचेही स्वागत करण्यात आले.   यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सा.प्र. वि ) चंद्रकांत पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी ) मानसी बोरकर , उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत ) डी.वाय.जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर , कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे , पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रशांत कांबळे , महिला व बाल कल्याण अधिकारी संतोष भोसले तसेच तालुक्याचे गट विकास अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.  

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email