योगगुरु बाबा रामदेव आता टेलिकॉम क्षेत्रातही

बीएसएनएल आणि पतंजली यांच्या वतीने संयुक्तपणे लाँच करण्यात आले ‘स्वदेशी समृद्धी सिम कार्ड’

नवी दिल्ली – योगगुरु बाबा रामदेव यांनी आता टेलिकॉम क्षेत्रामधे प्रवेश केला असून नुकतेच रामदेव बाबांनी एक सिम कार्ड लाँच केले आहे. ‘स्वदेशी समृद्धी सिम कार्ड’ असे या कार्डचे नाव असून हे कार्ड भारत संचार निगम लिमीटेड (बीएसएनएल) आणि पतंजली यांच्या वतीने संयुक्तपणे लाँच करण्यात आले आहे.
सध्या हे कार्ड केवळ पतंजली कर्मचाऱ्यांसाठी असेल. फक्त १४४ रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. त्यासोबतच २जीबी डेटा आणि १०० एसएमएस सुविधाही देण्यात आली आहे. सध्या फक्त पतंजली कर्मचाऱ्यांसाठी हे सिम लाँच केले आहे, पण जेव्हा हे सर्वसामान्यांसाठी लाँच केले जाईल तेव्हा या सिमवरुन पतंजली उत्पादनांवर १०% सूट दिली जाणार आहे. तसेच सिमच्या यूजरला २.५ लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल लाइफ इन्शुरन्स आणि ५ लाख रुपयापर्यंतचे लाइफ लाइफ इन्शुरन्स दिले जाणार आहे

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email