यार्डमध्ये उभ्या असलेल्या एक्स्प्रेसच्या डब्याला आग,कोणतीही जीवितहानी नाही
अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या
मुंबई -सी.एस.एम.टी.येथील यार्डमध्ये उभ्या असलेल्या एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागल्याचे वृत्त आहे. सुरुवातीला ही आग सी.एस.एम.टी.रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १८ वर लागली असल्याचं सांगण्यात येत होतं. पण ही आग फलाटावरील एक्स्प्रेसच्या रिकाम्या डब्याला लागली नसून यार्डमध्ये उभ्या असलेल्या डब्याला लागली आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.सुदैवाने एक्स्प्रेस रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Please follow and like us: