यापुढे शाळांमध्ये छडीची शिक्षा होणार बंद !

(म.विजय)

मुंबई – ‘छडी लागे छम छम’ हे विसरून आता शिक्षकांना विद्यार्थी घडवावे लागणार आहे. कारण कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना छडीची शिक्षा देऊ नये असे आदेशच राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने दिले आहेत. त्याचे कसोशीने पालन करण्याच्या सूचना राज्याच्या शिक्षण संचालनालयाने सर्व माध्यमांच्या शाळांना काल दिल्या.

कोणत्याही विद्यार्थ्याला शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागू नये अशी तरतूद शिक्षण बालहक्क कायद्यात आहे. त्याचा दाखला देत शिक्षण संचालनालयाने शाळांमधून छडीची शिक्षा वगळण्याच्या सूचना प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना देण्यात याव्यात आणि त्यावरील कार्यवाहीचा अहवाल सादर करावा असे परिपत्रक प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी काढले.

त्याबरोबरच राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांची माहितीही सर्व विभागांना देण्यात आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email