यश जिमखाना जलतरण स्पर्धेत अपंगांचा विशेष गट

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – यश जिमखाना जलतरण स्पर्धेत अपगांना संधी देण्यात आली असून त्यासाठी अपंगांचा विशेष गट बनविण्यात आला. यात कल्याण-डोंबिवलीतून आलेल्या साक्षी परब, दिव्येश विचारे , दिपेश शर्मा, सानिया शेख यांनी भाग घेतला. यातील खेळाडूंना राजू वडनेरकर आणि हेमलता वडनेरकर आणि युवक वडनेरकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. स्पर्धेचे आयोजन विलास माने स्विमिंग प्रशिक्षक व रवि नवले यांनी केले होते.

जलतरण स्पर्धेत एकूण २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये ५ वर्षापासून ६५ वर्षापर्यंतच्या व्यक्तीनी सहभाग घेतला. स्पर्धेत ज्येष्ठ नागरिक, लहान मोठी मुले-मुली आणि महिलांचा असे १३ गट बनविण्यात आले होते.स्पर्धेत पहिल्या ३ नंबरला पदक व प्रशस्तीपत्र व स्पर्धेत भाग घेणाऱ्याना प्रशस्तीपत्र देण्यात आले. स्पर्धेत व्यंकटेश पतंगे,सुरेंद्र कदम, प्रशांत कुलकर्णी,निता बोरसे, सतिश कौशिक, शलाका कौशिक, संध्या माने,अनघा पतंगे,केदार ,रुपेश भंडारी, आणि यश जिमखाना मँनेजर मनोज सापरा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तर वेदांत चौधरी, सुजल कदम,ओमकार कुलकर्णी, सिध्दी कदम, कशिश टिलवानी, सृष्टि कदम, दिपेश शर्मा, दिव्येश विचारे, साक्षी परब,ओम कौशिक, सागर कौशल, अंशुमन वशिष्ठ, आदिती साळवी, किंवा खाटोकर, आर्या जगताप, अल्पा जगताप, आरुष हळदणकर, आरुष उटकूर, मनिषा साळवी, दिपीका म्हात्रे, विना कुलकर्णी, कुणाल लोखंडे, रणबीर सिंह बिस्ट, क्षितिज जाधव, प्रिती अंचलू,तनिष्का हवालदार, आईषा टावेरा, प्रसाद म्हात्रे, अनुराग कुलकर्णी अथर्व कुलकर्णी, तनिष्का हातेकर, ईषिका कांबळी, वियांका मालवणकर, कृतश जठार, तनय सोनावणे, यश शेट्टी,कतरीन जोसेफ, जुही नायक, शिविका मुलकी, प्रिती तोडणकर, लेखा कुरकुरे, प्राजक्ता गायकवाड श्रीपाद दांडेकर, संजय जयस्वाल, चारी, वैशाली तावडे, चित्रा चव्हाण, सुप्रिया बागुल,प्रद्नेश डोल्हारे, वैभव वशिष्ठ, समर्थ हळदिवे, निलशिखा भावसार, आर्या केकरे, आग्रीमा चव्हाण,गौरव ब्रीद, स्वितेक्श चंद्रन निनाद शिंदे या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email