मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेला ठाणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद

मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेला

ठाणे जिल्ह्यात चांगला प्रतिसा

सुमारे २० हजार नागरिकांची तपासणी

ठाणे दि ६  : मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेला ठाणे शहर व जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात एकूण २ लाख ६० हजार ४१० नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट्य आहे. आत्तपर्यंत ग्रामीण आणि शहरी भागात मिळून २० हजार जणांची तपासणी झाली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे.  

जिल्ह्यात आशा कार्यकर्ती आणि एएनएम यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात नागरिकांपर्यंत जाऊन या मोहिमेसंदर्भात जाणीव जागृती केली जात आहे आणि त्यांची मौखिक आरोग्य तपासणी केली जात आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ केम्फी पाटील यांनी दिली.

 जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विभाग, जिल्हा परिषद, पोलीस, जीएसटी कार्यालये, गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालये, मनपा व नगरपालिका शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आयकर विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, वन विभाग, महिला व बाल कल्याण विभाग कार्यलय अशा कार्यालयांमध्ये ३१ डिसेंबर पर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे.

इंडियन डेंटल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, त्याचप्रमाणे सर्व पालिकांचे वैद्यकीय विभाग यात सहभागी आहेत अशी माहिती या मोहिमेच्या समन्वयक  

राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या मोहिमेचा शुभारंभ 1 डिसेंबर रोजी मुंबईतील मालवणी शासकीय रुग्णालयात आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला होता. या मोहिमे अंतर्गत राज्यातील 30 वर्षावरील स्त्री व पुरुषांची मौखिक तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी सर्व शासकीयमहापालिका,नगरपालिका दवाखाने येथे मोफत उपलब्ध असणार आहे. तसेच गाव पातळीवर ही तपासणी एएनएम व एमपीडब्लू यांच्यामार्फत करुन गरजू लोकांना पुढील उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात पाठविण्यात येणार आहे. यामध्ये उपचार हे पूर्णत: नि:शुल्क असणार आहेत.

राज्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून लोकांनीही या मोहिमेत सहभागी होऊन मौखिक तपासणी करुन घ्यावीअसे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email