मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने सोनसाखळी चोरली
कल्याण – कल्याण पश्चिमेतील वसंत व्हेली बस डेपो जवळ चिंतन इमारतीत राहणारी महिला आपले पती आणि मुलीसह अमृत पार्क येथून पायी घरी जात होती. त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यावर थाप मारीत 97 हजार 500 रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून धूम ठोकली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us: