मोटरसायकल अपघातात २ ठार : १ जखमी

टिटवाळा – भरधाव वेगाने जाणारी मोटरसायकल व अज्ञात वाहनाची धडक झाल्याने त्यात मोटरसायकलवरील ३ जणांपैकी २ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कल्याण मुरबाड रोडवर पाचवामैल परिसरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री  साडेबाराच्या सुमारास नौशाद  शेख(२६) रा.रायता, सचिन मगर(२५) व मोहमद शोकत अन्सारी (३०) असे तिघे एकाच मोटरसायकलवरून ट्रिपल सिटने रायताकडे चालले होते. त्यावेळी भरदाव वेगाने येणा-या अज्ञात वाहनाची व या मोटरसायकलची धडक लागल्याने मोटरसायकलवरून तिघेही खाली पडल्याने ते गंभिर जखमी झाले. सचिन व मोहमद अन्सारी या दोघांचा जागिच मृत्यू झाला. तर जखमी नौशाद याला प्रथम उपचाराकरीता उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती चिंता जनक झाल्याने त्याला मुंबईतील रूग्णालयात हालवण्यात आले आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email