मृताच्या पाकिटात सापडलेल्या एका फोटोवरून खुनाचा छडा ; ३ अटक १ फरार

अवघ्या ४ ते ५ तासाच्या आत अटक

ठाणे – मृताच्या पाकिटात सापडलेल्या एका फोटोवरून खुनाचा छडा लावण्यात चितळसर मानपाडा पोलीसांना यश आलंय.याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून १ आरोपी फरार झाला आहे.न्यायालयाने त्यांना ३१ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
२५ मार्चला दुपारी  तरुणाचा खून करुन आरोपी पळुन गेले होते , चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांना याप्रकरणी कळताच त्यांनी  घटना स्थळी धाव घेउन ज़ख़्मी तरुणाला हॉस्पिटल मध्ये दाखल केले , परंतु त्याच्यावर जिवघेण्या जखमा असल्यामुळे  उपचारा अगोदरच त्याचा मृत्यू झाला,त्याच्या पाकिटात पँन कार्ड व एका तरुणीचा फोटो मिळाला पँन कार्ड वरुन मयताचे नाव वसीम रशीद फकीर खान असल्याचे समजले , मयताच्या पाकिटात मिळुन आलेल्या मुलीच्या फोटोच्या आधारे तीचा धर्मवीर नगर तुलशीधाम , सुभाष नगर व अन्यत्र शोध घेतला असता , धर्मवीरनगर येथे ती मिळुन आली , या मुलिकडे चौकशी केली असता तीने कबुल केले की तीचे व मयताचे प्रेम संबंध होते , तीचा विवाह ठरल्यामुळे व मयताचे लग्न झालेले असुन त्यास दोन मुले असल्यामुळे , त्या दोघांच्या प्रेम संबंधास तीच्या भावांचा विरोध होता अशी माहीती मिळताच पोलीसांनी तपासाची चक्र वेगाने फीरवुन आरोपी अरशद अबुलहसन खान ( 21) राहणार हरदास नगर , पोखरणनंबर 2,विवेक सिकंदर यादव ( 23 ) बालकूम दादलानी ठाणे तीसरा रतनलाल उर्फ सोनु राजनाथ यादव ( 26 ) धर्मवीर नगर ठाणे याना गुन्हा दाखल झाल्यापासुन 4 ते 5 तासाच्या आत अटक केले , चौथा आरोपी फरार असुन तो लवकरच पकड्ला जाइल असे उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी सांगितले , या आरोपिंकडे चौकशी केली असता त्यानी मयत वसीम खान याला वीव्हीआना मॉल येथून रिक्षात घालून धर्मवीर नगर येथे आणले व तिकडे त्याला मारझोड करायला सुरुवात केली , तिकडेच पडलेलि एक बाटली ऊचलुन त्याच्या डोक्यात घातली , व तीच फुटलेलि बाटली त्याच्या गळ्यात खुपसली व त्याला तीथेच फेकून आरोपीनी पलायन केले , पोलीसांनी या तीघांना न्यायालया समोर हजर केले असता , न्यायालयाने त्यांना ३१ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email